फक्त परीणाम वेगवेगळे आहेत

- मृत्यू सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हे बैठका अधिष्ठान कशाला. जो मनुष्य मौज-मस्ती करतोय बैठकीला येत नाही त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि आह्माला मृत्यू येणारच आहे.
 - मांजर जेव्हा उंदराला पकडते तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन दुसर्‍या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे, फक्त परीणाम वेगवेगळे आहेत.
तसेच मृत्यू एकच आहे पण एक समर्था च्या
चरणामध्ये विलीन होईल तर दुसरा ८४ लक्ष
योनींच्या फेर्‍यामध्ये अडकेल....

Comments

Popular posts from this blog